कोअर बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनीच्या मुंबई कार्यालयाचे उद्घाटन १४ फेब्रुवारीला पार पडणार
मुंबई-(प्रतिनिधी) कोअर बँकिंग क्षेत्रातील ४ हजार पतसंस्थाना संपूर्ण महाराष्ट्रात सॉफ्टवेअर देणारी हिजयुअल इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडच्या मुंबई येथील कार्यालयाचे उद्घाटन शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सुजाता चेंबर, अभयचंद गांधी मार्ग, मज्जिद बंदर (पश्चिम) येथे पतसंस्था व्यवस्थापन डायरीचे संपादक अंकुश यादव यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे.
याप्रसंगी दत्त दिगंबर चे कुटुंब प्रमुख लक्ष्मण निकम, शिवप्रसाद को-ऑपरेटिव्ह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण चोरगे, जगन्नाथ पतपेढी चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोहिते, पुष्पक सोसायटीचे जनरल मॅनेजर किरण पवार, श्लोक को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अविनाश पाटील, देवांग सहकारी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष तानाजी तोडकर, निवडणूक निर्णय अधिकारी व राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष, वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत कामगार डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला सर्व सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व सॉफ्टवेअर क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन हिजयुअल इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक भाऊराव धोंडे पाटील, सीईओ योगेश कोठाळे, सेल्स मॅनेजर सुभाष यादव आदींनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

