सामाजिक

भीमराव धुळप यांना केतकी प्रकाशनचा ‘साहित्य गौरव’ पुरस्कार


नवी मुंबई,प्रतिनिधी

धगधगती मुंबई या वृत्तपत्राचे संपादक तथा महाराष्ट्र शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप यांना पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘साहित्य गौरव’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

केतकी प्रकाशनचे संपादक चंद्रकांत जाधव, साहित्यिक तथा ज्येष्ठ नागरिक भवनचे अध्यक्ष विकास साठे, लेखक रमाकांत जाधव, गजानन म्हात्रे, अजित मगदूम, वृषाली मगदूम, प्रभाकर जेजूरकर तसेच माजी प्राचार्य क्रांती जेजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा नुकताच ज्येष्ठ नागरिक भवन, सेक्टर १२, नेरूळ, नवी मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

गेल्या अनेक वर्षांपासून निर्भीड पत्रकारिता, समाजहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व साहित्यिक,लेखक यांचाही यथोचित गौरव केतकी प्रकाशनच्या वतीने करण्यात आला.

यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सार्वजनिक जीवनातील अनेक अप्रकाशित व महत्त्वपूर्ण आठवणी लेखक प्रथमेश मलईकर यांनी ‘History Will Be Kinder’ या पुस्तकात शब्दबद्ध केल्या असून, या पुस्तकाचे प्रकाशन केतकी प्रकाशनचे संपादक चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *