गुन्हेसामाजिक

लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या चेंबूर वॉर्ड क्रमांक -१५५ च्या शाखा अध्यक्षपदी सुनिल साळुंखे यांची नियुक्ती


मुंबई-लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या चेंबूर वॉर्ड क्रमांक १५५ पदी सुनिल साळुंखे यांची नियुकी करण्यात आली आहे.संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांच्या आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे. सुनिल साळुंखे यांच्या नियुक्तीसाठी मुंबई महानगर अध्यक्ष पांडुरंग सकटे, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष वसंत पुत्रण, घाटकोपर पश्चिम विधानसभा अध्यक्ष विकास गायकर, घाटकोपर पूर्व विधानसभा अध्यक्ष महेंद्र कदम चांदिवली विधानसभा अध्यक्ष यांनी विशेष प्रयत्न केले.

सुनिल साळुंखे यांच्या नियुक्तीमुळे चेंबूर विभागातील ग्राहक संरक्षण कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक पातळीवर जनजागृती, तक्रार निवारण आणि ग्राहक अधिकारांची भक्कम अंमलबजावणी यासाठी साळुंखे यांचे नेतृत्व संस्थेला अधिक बळकटी देणार आहे.नवीन जबाबदारी स्विकारताना साळुंखे यांनी संस्थेच्या उद्दिष्टांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *