गुन्हे

सायन येथे क्राईम इन्वेस्टीगेशन बोर्ड दिल्लीच्या कार्यालयाचे उद्घाटन


मुंबई-(संतोष शिंदे)Crime Investigation Board Delhi (ऑल इंडिया स्पेशल क्राईम इन्वेस्टीगेशन फोर्स) या संस्थेच्या सायन येथील नव्या कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक आर. के. मीणा यांच्या हस्ते फित कापून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

संस्थेचे मुंबईतील कार्यालय सुंदर कमला नगर बिल्डिंग नंबर-१, जी-२३, भाऊ दाजी रोड एक्स्टेन्शन, सायन (मुंबई) येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून मुंबईसह राज्यभरातील विविध सामाजिक व गुन्हे तपासाशी संबंधित कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आर. के. मीणा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि भविष्यातील उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली.

समाजात कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, गुन्हे प्रतिबंधासाठी सहकार्य करणे आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सायन येथील नव्या कार्यालयाच्या स्थापनेमुळे संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळून नागरिकांपर्यंत सेवा अधिक जलदगतीने पोहोचेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक आर. के. मीणा यांनी व्यक्त केला आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *