गुन्हे

साताऱ्यात उभारणार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णांकृती पुतळा


 

लवकरच पुतळ्याचे अनावर करण्याचे अभिजीत बापटांचे आश्वासन

‌‌ ‌‌मुंबई -(चंद्रकांत अवघडे)संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये लोककलेतून जनजागृती करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा साताऱ्यामध्ये उभा राहणार आहे.

एक कोटी रुपये खर्च करून सातारा नगरपरिषद हा पुतळा उभारणार असून या पुतळ्याची पाहणी मुंबईतील अभ्यास समितीने करून त्यामधील काही त्रुटी शिल्पकाराच्या निदर्शनास आणल्या, दरम्यान या पुतळ्याचे काम पूर्णत्वास आल्यामुळे लवकरच त्याचे अनावरण केले जाईल असे आश्वासन सातारा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांनी दिले.

बारा फूट उंचीच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारणीची निविदेचे काम मुंबईतील सुजित गौंड यांच्या सर्कल क्रिएशन गोरेगाव मुंबई या कंपनीला देण्यात आलेले आहे, पुतळ्याच्या त्रुटी, सूचविण्यात आलेले बारकावे, दुरुस्त करण्याचे आश्वासन क्रिएशन कंपनीच्या व्यवस्थापक स्वाती यांनी पुतळा समितीला बोलताना दिले.

पुतळा निर्मितीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, त्यामुळे समाधान वाटते. पुतळा अनावरणाचा सोहळा लवकरच आयोजित केला जाईल, असे सातारा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांनी समितीला बोलताना सांगितले.

या पाहणी दौऱ्यामध्ये भाजपाचे अजितकुमार सोनावणे, माजी सभापती नगरसेवक अमर गायकवाड, वंचितचे सातारा जिल्हा महासचिव गणेश भिसे, संतोष सोनवणे, किशोर गालफाडे, गणेश वाघमारे, तुषार बोकेफोडे, तसेच अण्णाभाऊंचे वारसदार सचिनभाऊ साठेंचा समावेश होता.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *