धार्मिकपर्यटन

अतिवृष्टीमुळे कार्ला येथील श्री एकवीरा देवी मंदिर चार दिवस दर्शनासाठी बंद


कार्ला (मावळ)-प्रतिनिधी

परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कार्ला येथील प्रसिद्ध श्री एकवीरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मंदिर प्रशासनाने चार दिवस मंदिर दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट, वेहेरगाव (कार्ला) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पायऱ्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये तसेच गडावर कोणतीही वाहने घेऊन जाऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
देवस्थान ट्रस्टच्या सूचनेनुसार दि. १४ जुलै २०२६ पासून मंदिर दर्शन सर्व भाविकांसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

मंदिर प्रशासनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत सुरक्षिततेच्या दृष्टीने या निर्णयाला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून भाविकांनी अनावश्यक गर्दी टाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *