धार्मिकसामाजिक

संत रोहिदास जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन


मुंबई-(संतोष शिंदे )राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने संत रोहिदास यांच्या ६५० व्या जयंती महोत्सवानिमित्त राष्ट्रीय संत रोहिदास महाराज, संत कक्कया महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी असून संत व महामानवांच्या विचारांवर आधारित निबंध लिहिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दिनांक ३१जानेवारी पासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांनी आपले निबंध १० फेब्रुवारी पर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत संस्थेकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विभागातील शाळांमध्ये राष्ट्रीय चर्मकार संघामार्फत पत्रके वितरित करण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत धारावी येथील श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल, सायन येथील डी. एस. हायस्कूल, साधना विद्यालय तसेच युनिव्हर्सल रात्र शाळा, धारावी येथे निवेदन पत्र देण्यात आले आहे. तसेच माटुंगा, कुर्ला, माहीम व धारावी परिसरातील शाळांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवण्याचा संघाचा प्रयत्न आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन संघाचे अध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून प्रदेश अध्यक्ष रामभाऊ कदम, मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकर, सचिव गणेश खिल्लारे, माजी मुख्याध्यापक पोटे सर आणि धारावी तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या कामासाठी संपर्कप्रमुख शंकर खिल्लारे व समन्वयक शंकर बळी कार्यरत असून, शाळा मुख्याध्यापकांना निवेदन सादर करताना गिरीराज शेरखाने, संदीप सोनवणे, चंद्रकांत जाधव, श्रीमती अलका साबळे, सविता शेरखाने व तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार संघाकडून देण्यात आली आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *