गुन्हेसामाजिक

डॉ.प्रभाकर कांबळे इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड अवार्ड ने सन्मानित


ठाण्यात रंगला इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचा कौतुक सोहळा

मुंबई (प्रतिनिधी)-विक्रोळी टागोर नगर येथील वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष गुणवंत कामगार डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांना सन 2026 चा इंटरनॅशनल इमेज बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड चित्रपट अभिनेता दीपक जोशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल देऊन प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समृद्धी प्रकाशन चे प्रा. डॉ.बी एन खरात होते.

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस, एशियन युथ इमेज कॉन्फरन्स अँड अवॉर्ड शिरोमणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय, पहिला मजला रेगे सभागृहात कौतुक सन्मान रेकॉर्ड सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्याचे यजमानपद माझ्या नवऱ्याची बायको व होणार सून मी या घरची, तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील अभिनेते दिपक जोशी त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेविका मानसी परब राणे ,नागरी संरक्षण दलाचे विजय जाधव ,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भूपेंद्र संखे, ज्येष्ठ समाजसेवक भरत खांडेकर गुणवंत कामगार डॉ.पी.टी. कांबळे, सहकार तज्ञ डॉ. आर. एस .जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुणवंत कामगार केरबा डावरे , बाळकृष्ण तावडे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, सीए के आर.बिद, यांना प्राईड ऑफ हिंदुस्तान अवार्ड, डॉ. राजेंद्र जाधव यांना भारत प्रतिभा सन्मान पुरस्कार, गुणवंत कामगार तानाजी निकम ,नागोराव शिकारे ,सहकार तज्ञ दिपक शिंगरे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार ,चंद्रकांत मोरे यांना द ग्रेट कोकण रत्न अवॉर्ड राजू सोनकांबळे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार, वैशाली कांबळे यांना भारत प्रतिभा सन्मान पुरस्कार, सुनील मोहिते यांना द ग्रेट कोकण रत्न अवॉर्ड, शिवराम सांगळे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, अष्टपैलू कलाकार राजेंद्र सावंत भारत प्रतिभा सन्मान पुरस्कार,राष्ट्रपती पुरस्कार विजेते तुकाराम पाटील यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, प्रशांतकुमार शेवरेगार यांना प्राइड ऑफ हिंदुस्तान अवार्ड, डॉ.संतोष कांबळे व दिलीप शिरसाट, अनिल कुमार हरकुळकर,रमेश नाईक आदी मान्यवरांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

या कौतुक सोहळयाची सुरुवात द्वीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक डॉ.बी एन खरात यांनी केल्यानंतर प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. चित्रपट अभिनेते दिपक जोशी, उपनियंत्रक विजय जाधव, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भूपेंद्र सखे आदी मान्यवरांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *