गुन्हेशहर

चेंबूरच्या अल्टा विस्टा एसआरएतील पाणी टंचाईवर आमदार तुकाराम काते आक्रमक ; पालिका अधिकाऱ्यांची घेतली भेट


चेंबूर(प्रतिनिधी)-चेंबूर येथील अल्टा विस्टा एसआरए इमारतीमध्ये मागील अनेक दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असल्यामुळे दैनंदिन गरजा भागवताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर सोसायटीतील काही सजग रहिवाशांसह चेंबूरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार तुकाराम काते यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम-पश्चिम विभागातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. अल्टा विस्टा एसआरए सोसायटीला नियमित, मुबलक व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

इमारतीतील रहिवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पाणीपुरवठ्यात तातडीने सुधारणा करण्याची विनंती आमदार काते यांनी केली. यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे तसेच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीमुळे अल्टा विस्टा एसआरए इमारतीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल,अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *