सामाजिक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त २० हजार चपात्यांचे अन्नछत्र- भाजप माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांचा पुढाकार


मुंबई-(संतोष शिंदे)-महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो अनुयायांची शिवाजी पार्कमध्ये गर्दी होत आहे. जगभरातून दूरदूरून येणाऱ्या भाविकांच्या भोजनाची सोय सुरळीत व्हावी यासाठी प्रभाग क्र. १७२ मधील मा. नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेत, एकूण २०,000 चपात्यांचे अन्नछत्रासाठी आपले योगदान दिले आहे.

विशेष म्हणजे, या चपात्या तयार करण्याच्या कार्यात अनेक महिलांसोबत नगरसेविका शिरवडकर यांनी स्वतःही सहभाग घेत, भिम अनुयायांची सेवा हीच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली असल्याचा संदेश दिला. समाजसेवा, समर्पण आणि कृतज्ञता यांचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून पाहायला मिळत आहे.

या उपक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, वेळेचे योग्य नियोजन व सेवाभावामुळे या अन्नछत्राची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरळीत पार पडली. हजारो अनुयायांना पोषणयुक्त भोजन उपलब्ध करून देत, महापरिनिर्वाण दिनी केलेले हे योगदान समाजातील ऐक्य, सहकार्य आणि संवेदनशीलता अधोरेखित करणारे ठरणार आहे.

बाबासाहेबांच्या विचारांप्रती निष्ठा आणि समाजकार्यातील सातत्य याचे हे उत्तम उदाहरण असल्याने स्थानिक नागरिकांकडून भाजप मा. नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांच्या पुढाकाराने पार पडत असलेल्या या उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *