धारावीतील झोपडीला लागली आग-सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
मुंबई-(शिवा नाडार)धारावीतील 60 फूट रोड परिसरातील नवरंग कंपाऊंड येथे आज दुपारी लागलेल्या आगीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज दुपारी 12.29 वाजता ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने (MFB) तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग ही ग्राउंड प्लस वन संरचनेच्या झोपडीपुरती मर्यादित होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशमन दलाने परिस्थितीचा आढावा घेत 12.32 वाजता सदर आग ही लेव्हल-1 ची असल्याची माहिती दिली.
घटनास्थळी पालिका,अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका सेवा तसेच महापालिकेचे प्रभागीय कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अग्निशमन जवानांनी अल्पावधीत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करुन आग आटोक्यात आणली.सदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याची नोंद नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

