गुन्हेराजकीय

चेंबूर प्रभाग क्र. १५५ मध्ये भाजपच्या वर्षा शेट्ये यांच्या प्रचाराला जोर


सुमन नगर येथील भाजप निवडणूक प्रचार संपर्क कार्यालयाचे भाजप प्रदेशाध्यक्ष निरज उभारे यांच्या हस्ते उद्घाटन

चेंबूर-(संतोष शिंदे)-मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूर प्रभाग क्रमांक १५५ मध्ये भाजपच्या वर्षा शेट्ये यांच्या प्रचाराला वेग आला आहे.आज सकाळी सुमन नगर येथील भाजप निवडणूक प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष निरज उभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी आर पी आय चे संजय डोळसे तसेच महायुतीतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष निरज उभारे म्हणाले कि महायुतीच्या पाठीशी चेंबूरची जनता खंबीरपणे उभी आहे. यावेळी जनतेने ठरवले आहे कि या प्रभाग क्रमांक-१५५ मधून अधिकाधिक मताधिक्याने कमळाचा उमेदवार महापालिकेत पाठवायचा आहे आणि जनतेने उद्याचा महापौर महायुतीचा ठरवला आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी आमच्या वर्षांताईना शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो कि उद्याचा महापौर ज्यावेळेस सोळा तारखेला बसेल त्याच्या जल्लोषाचे आमंत्रण आजच तुम्हाला या उदघाटन प्रसंगी देतो असे शेवटी ते म्हणाले.

याचवेळी वर्षा शेट्ये यांचे पती व माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या प्रदीर्घ राजकीय व प्रशासकीय अनुभवाचा फायदा वर्षा शेट्ये यांच्या प्रचार व कामकाजाला निश्चितच होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामकाजाची जाण, नागरिकांच्या समस्या आणि उपाययोजना यांचा अनुभव असल्याने प्रभागाच्या विकासाला योग्य दिशा मिळेल, असे मत यावेळी मांडण्यात आले.

निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनानंतर वर्षा शेट्ये सुमन नगर, दत्त नगर, समर्थ नगर आदी परिसरात प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधला.राजकारण नव्हे तर सेवा हा आमचा मूलमंत्र असून, सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असा शब्द त्यांनी दिला.

चेंबूर प्रभाग क्रमांक १५५ मध्ये भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिकच रंग चढताना दिसत आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *