धारावीत अहिंसा संघातर्फे अयोध्येतील राम मंदिराच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त बुंदी वाटप
धारावी-(शिवा नाडार)अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त धारावी कामराज बिल्डिंग समोरील सुपर ज्वेलर्स या ठिकाणी अहिंसा संघाच्या वतीने नागरिकांना बुंदीचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून सामाजिक सलोखा, सद्भावना आणि आनंदाचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमादरम्यान संघाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधत राम मंदिर वर्धापन दिनाचा आनंद साजरा केला.
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमुळे देशभरात निर्माण झालेल्या श्रद्धा व सांस्कृतिक एकतेच्या भावनेचे प्रतीक म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे अहिंसा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अहिंसा संघाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

