गुन्हेराजकीय

ईश्वर ताथवडे यांची रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती


मुंबई-(संतोष शिंदे)-संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर ताथवडे यांची रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)च्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी जपत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मानत कार्य करणाऱ्या ताथवडे यांच्या अनेक वर्षाच्या समाज कार्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष देशकर खोब्रागडे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील निरभवने यांच्या आदेशाने १५ डिसेंबर रोजी ही नियुक्ती जाहीर झाली आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुका लढविण्याचा अनुभव तसेच प्रसारमाध्यमांतून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्यांना मिळवून देण्यात ताथवडे यांनी आजपर्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारावी विधानसभा क्षेत्रासह मुंबईत अनेक उमेदवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगू लागली आहे. ईश्वर ताथवडे यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

ईश्वर ताथवडे यांच्या नियुक्तीच्या वेळेस पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत घोडके, मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत,अण्णा कांबळे, कामगार नेते प्रकाश केदारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *