BSP चे अधिकृत उमेदवार इमरान मोहम्मद शेख यांना जनतेचा भक्कम पाठिंबा
धारावी प्रभाग क्रमांक 185 मध्ये BSP च्या हत्ती ची गर्जना
मुंबई-(प्रतिनिधी)धारावी प्रभाग क्रमांक 185 मध्ये यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या (BSP) हत्ती या निवडणूक चिन्हाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. BSP पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून इमरान मोहम्मद शेख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेशाने पत्रकार असलेले इमरान मोहम्मद शेख यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहूनही धारावीतील सर्वसामान्य, गरीब आणि वंचित जनतेच्या समस्या सातत्याने मांडल्या आहेत. आपल्या ‘हार्ट ऑफ मुंबई’ या चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी धारावीतील पाणी, स्वच्छता, घरांची दुरवस्था, आरोग्य, शिक्षण तसेच प्रशासनाशी संबंधित अनेक प्रश्नांना वाचा फोडली. केवळ बातम्या देऊन ते थांबले नाहीत, तर त्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करत प्रत्यक्ष मैदानात उतरून लढा दिला.
प्रभागातील नागरिकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्टपणे दिसून येते की, यावेळी धारावीतील सुज्ञ मतदारांनी इमरान शेख यांना मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवण्याचा निर्धार केला आहे. इतर पक्षांचे अनेक धनदांडगे उमेदवार रिंगणात असतानाही, प्रभाग क्रमांक 185 मध्ये इमरान शेख यांचे पारडे जड असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, आजपर्यंत कधीच लोकांमध्ये न दिसणारे काही माजी उमेदवार पुन्हा एकदा आपले नशीब आजमावण्यासाठी गल्लोगल्ली, दारोदारी फिरताना दिसत आहेत. मात्र, धारावीच्या मूलभूत समस्यांची जाण असणारा, त्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी थेट भिडणारा आणि प्रसंगी संघर्ष करणारा स्थानिक तरुण उमेदवार म्हणून इमरान मोहम्मद शेख यांच्याकडे पाहिले जात आहे.
यावेळी मुंबई महानगरपालिकेत धारावीचा आवाज पोहोचवायचा असेल, प्रभाग क्रमांक 185 मधील मूलभूत समस्या सोडवायच्या असतील तर त्या इमरान शेख यांच्या माध्यमातूनच असा निर्धार धारावी प्रभाग क्रमांक 185 मधील मतदारांनी केलेला आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

