गुन्हे

बनावट गुडनाइट उत्पादनांवर महाराष्ट्र पोलिसांचा छापा


मुंबई-गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांनी नागपूरमधील बनावट गुडनाइट उत्पादने तयार करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. यामध्ये 10,937 रिकामे गुडनाइट बॉक्स, 2,641 बनावट स्टिकर्स, 7 रिकामे कार्टन आणि 2 तयार उत्पादने आढळली.

या प्रकरणी बीएनएस कायदा 2023 च्या कलम 318 (4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकारी राज्यभरातील अशा रॅकेटचा तपास करत असून, ही कारवाई बनावट उत्पादकांसाठी इशारा ठरली आहे.

जीसीपीएलचे मुख्य विपणन अधिकारी अश्विन मूर्ती यांनी सांगितले की, बनावट उत्पादने ही केवळ बेकायदेशीर नाहीत तर आरोग्यासाठीही घातक आहेत. कंपनी ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुणवत्तेसाठी वचनबद्ध आहे.

ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, गुडनाइटची खरेदी करताना अधिकृत बिल घ्यावे आणि संशयास्पद उत्पादने आढळल्यास care@godrejcp.com वर किंवा 1800-266-0007 या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *