धारावी वॉर्ड क्र. १८५ मधून भाजपचे रमेश एन. नाडार प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत
मुंबई-(संतोष शिंदे)आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत धारावीतील वॉर्ड क्रमांक १८५ मधून भाजपचे मंडल अध्यक्ष रमेश एन. नाडार हे संभाव्य उमेदवार म्हणून प्रबळपणे उदयास येत आहेत. प्रभाग १८५ आणि १८६ चे मंडल अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या नाडार यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे धारावीकरांमध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे.
सेवाभावी व विनम्र स्वभावामुळे स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या रमेश नाडार यांनी पाणी, गटार, ड्रेनेज, रस्ते आदी विविध प्रकारच्या समस्यांच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्या सोडवल्या आहेत. धारावीतील वल्लभ बिल्डिंग, ९० फिट रोड येथील कार्यालयातून ते नेहमी नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध राहत असून, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र सरकार यांच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील सर्वस्तरांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.
धारावीतील स्थानिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, मोफत नेत्र चिकित्सा शिबिरे तसेच इतर सामाजिक उपक्रम नियमितपणे आयोजित करून नाडार हे गरीब व गरजू नागरिकांची सेवा नित्यनियमाने करीत आहेत. त्यांच्या समर्पणभाव आणि निःस्वार्थ कार्याचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत पक्षांतर्गत अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना योग्य उमेदवार मानत आपले समर्थन दर्शविले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून रमेश एन. नाडार यांना वॉर्ड क्रमांक १८५ (ओपन प्रवर्ग) मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्थानिक जनतेचा पाठिंबा आणि पक्षातील वाढता विश्वास पाहता, नाडार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

