गुन्हे

पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निर्णायक भूमिका घेण्याचा निर्णय


मुंबई- राज्यात सातत्याने वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्यांचा निषेध करत पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निर्णायक भूमिका घेण्याचा निर्णय आज विविध पत्रकार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. सकाळी अकरा वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या या बैठकीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, डिजिटल मिडिया परिषद महाराष्ट्र, मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोशिएशन, मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीस परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, राही भिडे, शरद पाबळे, शैलेंद्र दिनकर शिर्के, महेश म्हात्रे, किरण नाईक, मिलिंद आष्टीवकर, राजा आदाटे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सुजित महामुलकर, डिजिटल मिडिया परिषदेचे गणेश के. जगताप, युवराज सं. जगताप, राजेंद्र साळसकर, सुनील ह. विश्वकर्मा, अजय मगरे, विशाल सिंह आदी मान्यवर सहभागी झाले होते.

पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी सरकारला जाग आणण्याच्या उद्देशाने येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार लाखोंच्या संख्येने एसएमएस पाठवून त्वरित कायदा लागू करण्याची मागणी करण्यात येईल. त्यानंतरही सरकारने दुर्लक्ष केल्यास संविधान दिनाचे औचित्य साधून आझाद मैदान येथे एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *