गुन्हेशहर

सफाई कामगारांकडून अतिरीक्त काम करून घेणा-या महिला मनपा अधिका-याविरूध्द तक्रार


मुंबई -(प्रतिनिधी)नियमीत कामावर येणा-या कर्मचा-यांकडून गैर हजर असलेल्या कर्मचा-यांचे अतिरीक्त काम करून घेण्याकरीता त्यांच्यावर दबाव टाकणा-या मनपाच्या एका महिला अधिका-याविरूध्द सफाई कामगारांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार मुंबई महानगर पालिकेच्या जी दक्षिण विभागातील जी-1 मोटर लोडर चौकीत कनिष्ठ अवेक्षक या पदावर सुजाता जाधव या नावाच्या महिला अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी अलिकडेच सदर विभागाचा पदभार स्विकारला असून गैर हजर असलेल्या कामगारांचे अतिरीक्त काम त्या कामावर हजर असलेल्या कामगारांकडून करून घेत असल्याची तक्रार पीडित कामगारांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपल्या सहीनिशी केली आहे .

सदर पिडीत कामगारांनी त्यांना वाटून दिलेल्या कामाव्यतिरीक्त अतिरीक्त काम करण्यास नकार दिल्यास संबंधीत महिला अधिकारी त्यांचे चित्रीकरण करून त्यांना कायदेशीर कारवाईची धमकी देतात असा आरोप कामगार करीत आहेत. सदर महिला अधिकारी अनेक कामगारांना प्रती महा ८ हजार रूपयांच्या हप्त्यावर सुट्ट्या देतात आणि कामावर हजर असलेल्या कामगारांकडून अतिरीक्त काम करण्यास आपल्या पदाचा गैरवापर करत दबाव टाकतात असे कामगारांनी त्यांच्या वरीष्ठांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

सेवेत ज्येष्ठता नसतांनाही सदर महिला अधिकारी यांना आर्थिक व्यवहारातून पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप पिडीत मनपा सफाई कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. वृध्द कर्मचाऱ्यांसोबत बोलतांना देखील त्यांच्यासोबत अपमानजनक व्यवहार सदर महिला अधिकारी करत असल्याचेही पिडीत कामगारांचे म्हणणे आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *