सायन येथील कॅफे व्हिक्टोरियाचा परवाना रद्द करण्याची मागणी
असभ्य वर्तन, आगाऊ पेमेंटची सक्ती व अस्वच्छतेबाबत ग्राहकांचा आरोप
मुंबई(प्रतिनिधी)-सायन सर्कल येथील अनिता वाईन शॉपजवळ असलेल्या कॅफे व्हिक्टोरिया अँड रेस्टॉरंटच्या मालक व कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी असभ्य वर्तन केले जात असल्याचा आरोप पिडीत ग्राहकानेकेला आहे. तसेच ऑर्डर देण्यापूर्वीच आगाऊ रक्कम भरण्याची सक्ती केली जात असल्याने पिडीत ग्राहकाने नाराजी व्यक्त केली आहे.
पिडीत ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेचा अभाव असून अस्वच्छ (Unhygienic) वातावरणामुळे ग्राहकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. ग्राहकांशी उद्धटपणे वागणे, आगाऊ पैसे भरण्याची अट घालणे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी पिडीत ग्राहकाने केली आहे.
याप्रकरणी पोलीस, अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित विभागाने रेस्टॉरंटची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणीही पिडीत ग्राहकाकडून करण्यात येत आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

