सामाजिक

धारावी येथे एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर व शैक्षणिक किटचे वाटप


धारावी(प्रतिनिधी)-धारावी विभागातील ज्येष्ठ समाजसेवक दिलीप गाडेकर व गिरीराज शेरखाने यांच्या सहकार्याने नरेंद्र छाया कॉम्प्युटरचे संचालक नागेश कांबळे यांच्या वतीने बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्ट संचलित युनिव्हर्सल नाईट हायस्कूल, धारावी येथे एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिवसभर काम, नोकरी, घरकाम व मोलमजुरी करून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या तसेच दिवसाच्या शाळेत शिकू न शकणाऱ्या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही धारावीतील एकमेव रात्र शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असे शैक्षणिक किट भेट स्वरूपात देण्यात आले.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजू सोनवणे सर, वरिष्ठ शिक्षिका श्रीमती पळसमकर मॅडम तसेच शिक्षक बोराटे सर उपस्थित होते.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *