मोटारसायकल चोरीप्रकरणी पाहिजे आरोपी गोव्यातून ताब्यात
वेंगुर्ला पोलिसांची कारवाई-पणजी येथे सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात
सिंधुदुर्ग प्रतिनिधी-उमेश शेट्ये
वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातील पणजी येथून शिताफीने ताब्यात घेतले.
वेंगुर्ला पोलिस ठाणे गुरनं. ८९/२०२६, भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने गोव्यातील पणजी येथे सापळा रचून गुन्ह्यातील पाहिजे आरोपी धीरज दिलीप गुप्ता (वय २०, रा. गणेशनगर, कोलवले, गोवा) याला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला वेंगुर्ला पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, डॉमिनिक डिसोझा, पोलीस हवालदार जॅकसन घोन्सालविस, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, महेश्वर समजिस्कर आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री परब (सायबर) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

