साहित्य

उत्कर्ष भारत सन्मान सोहळ्यात ‘पदरापासून ते पासवर्डपर्यंत’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन


पुणे (प्रतिनिधी)-आसरा सोशल आणि ओम् पब्लिकेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ येथे आयोजित उत्कर्ष भारत सन्मान सोहळा-पुणे २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात लेखिका रामेश्वरी राहुल गाडगे लिखित ‘पदरापासून ते पासवर्डपर्यंत` या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मा. विजय गोखले यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), मा. धनराज हरडे, सौ. जयश्री विनोद भड आणि प्रा. डॉ. बी. एन. खरात आदी प्रमुख मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशनानंतर उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाचे भरभरून कौतुक केले. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधत, बदलत्या डिजिटल युगातील स्त्रीच्या जीवनप्रवासाचे वास्तववादी आणि संवेदनशील चित्रण या पुस्तकातून करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

समाजात सकारात्मक विचार जागविणारे आणि महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारे हे पुस्तक प्रत्येक वाचकासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सोहळ्याला साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कर्तृत्वाचा गौरव, साहित्याचा सन्मान आणि समाजाला प्रेरणा देणारा हा सोहळा उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्मरणीय ठरला.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *