नेरुळ येथे माघी गणेश जयंती निमित्त खाऊ वाटप
नवी मुंबई-(दिलीप गाडेकर) माघ गणेश जयंती निमित्त स्वप्निल गाडेकर परिवाराकडून गणेश जयंतीच्या मंगलदिनी प्रथम वर्ष तांडेल सदन, करावे गाव, नेरूळ सीवूड, नवी मुंबई येथे लालबागचा राजाची प्रतिकृती असलेली श्री गणेशाची मूर्तीची घरगुती स्थापना करण्यात आली त्यानिमित्त साईवाडी येथील अंगणवाडी क्रमांक 207 करावे गाव नागदेवी माता मंदिर सीवूड पश्चिम परिसरात अंगणवाडीतील बालकांना वरिष्ठ नागरिक ज्ञानेश्वर तांडेल यांच्या हस्ते बिस्किट पाकिटाचे वाटप करण्यात आले.
यावेळी फेस्कॉमचे संपर्क प्रमुख दिलीप गाडेकर हेही उपस्थित होते अंगणवाडीत एकूण 30 विद्यार्थी असून शिक्षिका विद्या बोराडे व मदतनीस छाया जाधव, ज्येष्ठ नागरिक विठ्ठल ढवळे यांच्या मुख्य उपस्थितीत या बालकांना खाऊ वाटप करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी फेस्कॉमचे मुंबई अध्यक्ष सुरेश पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत बालकांना खाऊ वाटल्यामुळे शिक्षिका विद्या बोराडे यांनी गाडेकर परिवार व तांडेल यांचे आभार मानले या उपक्रमाचे कौतुकही करण्यात आले.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे


