वाॅर्ड क्रमांक २६ मधील अपक्ष उमेदवार सचिन केळकर यांचे पारडे जड; प्रचारफेरीत नागरिकांचा वाढता प्रतिसाद
मुंबई-(प्रतिनिधी)मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार दिवस-रात्र एक करून प्रचारयात्रा, मतदारांशी थेट संवाद, कॉर्नर मीटिंग तसेच घरोघरी भेटी देत आहेत. अशा परिस्थितीत मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील वाॅर्ड क्रमांक २६ चे अपक्ष उमेदवार सचिन केळकर यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेत आपले पारडे जड केले आहे.
नागरिकांशी थेट संवाद, सातत्यपूर्ण संपर्क आणि विश्वासार्ह कार्यपद्धतीमुळे सचिन केळकर यांना वॉर्डातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिणामी वाॅर्ड क्रमांक २६ मध्ये उबाठा, भाजप आणि अपक्ष अशी तिघेरी लढत असली तरी प्रत्यक्षात अपक्ष उमेदवार सचिन केळकर यांची दुहेरी लढतीत आघाडी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोरोनाकाळापासून सचिन केळकर यांनी वाॅर्ड क्रमांक २६ मध्ये सामाजिक कामांसह नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. याच कार्याची पोचपावती म्हणून दामुनगर, लक्ष्मीनगर, लहूगड, गौतम नगर आणि सिंग इस्टेट येथून त्यांना वाढता जनसमर्थन मिळत आहे. प्रचारयात्रेत महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
“विचार केलाय भारी, सचिनदादाच्या विजयाची गगनभरारी”
प्रचारयात्रेदरम्यान नागरिकांनी“विचार केलाय भारी, सचिनदादाच्या विजयाची गगनभरारी”,“एकच वादा,सचिनदादा”
आणि
“आपली निशाणी – गॅस सिलेंडर”
अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या प्रचारयात्रेत बाबुराव चव्हाण, मच्छिंद्र डावरे, हेमलता नायडू, माधुरी समेळ, योगेश बाद्रे, हितेश समेळ यांच्यासह मोठ्या संख्येने मित्र, समर्थक व नागरिक उपस्थित होते.
⭐ प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस वचननामा ⭐
🔶 माझा वचननामा
✅ प्रभाग क्रमांक २६ स्वच्छ, सुंदर, दुर्गंधीमुक्त व वाहतूक कोंडीमुक्त करणार तसेच प्रत्येक घराला मोफत नळजोडणी देणार.
✅ प्रत्येक चाळीतील पायवाटा व गटारे सिमेंट काँक्रिटची करून चाळीसह मुख्य रस्ते अंधारमुक्त करणार.
✅ नागरिकांसाठी सुरक्षित पदपथ, अतिक्रमणमुक्त रस्ते करून नागरिक व फेरिवाल्यांसाठी स्वतंत्र मार्केट उभारणार.
✅ वनजमिनीवरील भीमनगर, लहूगड व गौतम नगरातील झोपडीधारकांना मूलभूत सुविधा पुरवून संपूर्ण विभाग नशामुक्त व भयमुक्त करणार.
✅ विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारून एमपीएससीसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू करणार.
✅ दामुनगर बस डेपो परिसरात मुंबई महानगरपालिका मार्फत सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना दर्जेदार व मोफत शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार.
✅ ‘आपला दवाखाना’ सोबतच उपलब्ध भूखंडावर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
✅ वनजमिनीवरील बाधित झोपडपट्टीधारकांचे दामुनगरमधील आरक्षित भूखंडावर पुनर्वसन करणार.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे


