गोवंडीतील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात महिला व बालकल्याण समितीचा दौरा
मुंबई-पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय येथे महिला व बालकांचे हक्क बाबत कल्याण समितीचा दौरा आमदार चित्रा वाघ आणि आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या दौऱ्यात आमदार सना मलिक, आमदार ज्योती गायकवाड तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे आणि अशोक ठाकरे यांनी प्रमुख अतिथींना तुळशीचे रोप देऊन सन्मानित केले आणि महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. त्यांनी रुग्णालय खाजगी संस्थेकडे देऊ नये तसेच रुग्णालयातील विद्यमान कमतरता तातडीने दूर करून सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

