आदर्श अग्रसेन दिवाळी विशेषांक – २०२५ साहित्य पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
रायगड (प्रतिनिधी)-आदर्श अग्रसेन दिवाळी विशेषांक – २०२५ साहित्य पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आदर्श अग्रसेन मासिकाचे संपादक चंद्रकांत पाटील यांच्या घरी शारदा चंद्रकांत पाटील निवास, इंद्र नगर, वडखळ, पेण, रायगड येथे आदर्श आगरी युवक मंडळाचे अध्यक्ष अनिल काशिनाथ गावंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रसंगी डॉक्टर श्रीकांत सदानंद पाटील (पेझारी, अलिबाग) व मनोज नाना पाटील (कळवे, पेण) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या शुभहस्ते कथा, लेख आणि कविता या साहित्य स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.
या समारंभासाठी आदर्श आगरी युवक मंडळाचे जनरल सेक्रेटरी अमित नागावकर, खजिनदार महेंद्र पाटील, संस्था संस्थापक रविंद्र नाईक, कार्यकर्ते तसेच आदर्श अग्रसेन मासिकाचे कार्यकारी संपादक नरेंद्र म्हात्रे, संपादक चंद्रकांत पाटील, निवासी संपादक दिलीप पाटील, वार्ताहर रामचंद्र म्हात्रे, अलिबाग–पेण तालुक्यातील अनेक सहभागी आणि विजयी साहित्यकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

