महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका निवडणुका बी आर एस पी पूर्ण ताकदीने लढवणार-ॲड. डॉ. सुरेश माने
मुंबई-(प्रतिनिधी)-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) च्या नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाराष्ट्रातील आगामी सर्व महानगरपालिका निवडणुका पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांनी केली आहे.
या बैठकीत पक्षाची निवडणूक रणनीती, संघटनात्मक मजबुतीकरण तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बहुजन, कष्टकरी, कामगार, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न थेट मांडण्यासाठी BRSP स्वतंत्र राजकीय भूमिका घेऊन मैदानात उतरणार असल्याचे ॲड. डॉ. सुरेश माने यांनी स्पष्ट केले.
तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) वगळता इतर समविचारी पक्षांशी युती करण्याचे अधिकार जिल्हा संयोजन समितीला देण्यात आले आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
स्थानिक परिस्थितीनुसार योग्य व व्यापक आघाड्या उभारून बहुजनांच्या हिताचे मजबूत प्रतिनिधित्व निर्माण करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

