महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली…!
हर सवाल का जवाब…बाबासाहेब.
मुंबई-(प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी असलेल्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त दोस्त कला मंच तर्फे दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी हर सवाल का जवाब…बाबासाहेब..! हा लक्षवेधी संगीतमय आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम बुधवार ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच ते नऊ या वेळेत दादर पश्चिम येथील दादर माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये होणार आहे.कार्यक्रमाची संकल्पना संयोजन रवि भिलाणे यांची आहे.हा कार्यक्रम विनामूल्य असून मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक संजय शिंदे,भानुदास धुरी,ज्योती बडेकर,अशोक विठ्ठल जाधव,राजू शिरधनकर,संदेश गायकवाड,प्रशांत राणे आदींनी केलं आहे.कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांना मुक्त प्रवेश आहे.
ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या शब्दात माईसाहेब आंबेडकर यांचे मनोगत,महात्मा फुले,शाहू महाराज यांचे व्यक्तिमत्व सादरीकरण,बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे चित्रीकरण करणाऱ्या दिवंगत नामदेव व्हटकर यांच्या कुटुंबियांचा कृतज्ञता सन्मान हे यंदाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असणार आहे.
त्याच बरोबर विठ्ठल लाड आणि सहकाऱ्यांचे आदिवासी अस्मिता नृत्य,सुनंदा नेवसे पाटील,चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे,अभिनेत्री दिपाली बडेकर,जयवंत हिरे, छायाताई कोरेगावकर, संदेश शालिनी संभाजी कर्डक,निनाद सिद्धये,बाळासाहेब उमप गजेंद्र मांजरेकर,मंजुषा गोवर्धन पेशवे,अदिती पोपट सातपुते, अनहद संध्या संदेश आदी कार्यकर्त्या कलावंतांनी सादर केलेल्या कविता,गाणी,नाट्यछटा,राकेश सुतार निर्मित फुले शाहू आंबेडकर यांचे चित्रशिल्प अशा बहुविध कला प्रकाराद्वारे बाबासाहेबांना सांगीतिक आदरांजली अर्पण केली जाणार आहे.
मुंबईकर जनतेने मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित रहावं असं आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक राजा आदाटे,काशिनाथ निकाळजे,सुनील साळवे,प्रदीप सूर्यवंशी,पोपट सातपुते,संध्या पानसकर,संजीवनी नांगरे,बाळासाहेब पगारे,ऍड. चित्रा गोसावी,शैलजा सावंत,विजय त्रिभुवन, ऍड.ज्योत्स्ना बनाले,विक्रांत लव्हांडे, प्रकाश महिपती कांबळे,नसीमा शेख,अश्विन कांबळे,सतीश जळगावकर आदींनी केलं आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

