इंटरनल हॅकाथॉन एस आय एच २०२५ स्पर्धा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी-यादवराव तासगावकर इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी महाविद्यालय, भिवपुरी कर्जत महाराष्ट्र येथे इंटरनल हॅकाथॉन एस आय एच २०२५ ही स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी एकूण बारा (१२) ग्रुपनी भाग घेतला होता. यामध्ये यादवराव तासगावकर कॉलेजच्या सहा (६) ग्रुप आणि इतर कॉलेजच्या सहा (६) ग्रुप यांनी भाग घेतला होता. एका ग्रुपमध्ये चार (४) विद्यार्थी असे एकूण अठ्ठेचाळीस (४८) विद्यार्थी होते.
ही स्पर्धा दिनांक २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली. यामध्ये दुसरा (२रा) क्रमांक कुमार वेदांत दिपक कायंदेकर यांच्या ग्रुपला मिळाला.
या चौघांनी ए आय कंपनियन पर्सनलाइज्ड लर्निंग ट्युटर आणि रँडम व्हिडिओ कॉल मीटिंग हे प्रोजेक्ट सर्व जजसमोर सादर केले. एकूण चार (४) राऊंड झाले.
या वेळी प्रमुख चीफ गेस्ट डॉ. नंदकुमार तासगावकर सर आणि सी.ई.ओ. पराग ओला सर यांनी कुमार वेदांत दिपक कायंदेकर, कुमार पार्थ देशपांडे (हे दोघे यादवराव तासगावकर महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या चौथ्या (४थ्या) वर्षात शिकत आहेत), कुमारी वैष्णवी साकरे आणि कुमार अमर नरसाळे (हे दोघे पहिल्या (१ल्या) वर्षात) यांचा सत्कार ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि रोख पारितोषिक देऊन करण्यात आला.
वेदांत हा योगा टीचर असून किक बॉक्सिंग आणि कराटे सुद्धा शिकवतो. अजूनही तो खेळतो. कराटेमध्ये तो ब्लॅक बेल्ट असून पहिला (१ला) डन आहे.
या वेळी डॉ. हरीश बारापात्रे सर, डॉ. प्रशांत सिंग उपस्थित होते.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

