गुन्हेसामाजिक

खार येथील आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‌


‌‌अभिनेता कॉमेडी किंग अरुण कदम यांच्या उदंड प्रतिष्ठान, वैशाली फाउंडेशनचा उपक्रम

‌‌मुंबई-उपनगरातील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खार येथील आंबेडकर रोड, सारनाथ बुद्ध विहार लिंबूनी बिल्डिंग येथे उदंड प्रतिष्ठान , वैशाली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल राजेंद्र रुके यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‌

अभिनेता कॉमेडी किंग अरुण कदम यांनी उपस्थिती दर्शवून सर्वांचे लक्ष वेधले, अशा आरोग्य शिबिरातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखले गेल्याने समाज स्वास्थ्य समतोल राहील, असे गौरव उदगार अभिनेता अरुण कदम यांनी काढून वैशाली फाउंडेशन, उदंड प्रतिष्ठान यांचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपाचे सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार ही उपस्थित होते.

जगात काहीच वर्षांपूर्वी आपण कोविड सारख्या महामारीतून बाहेर पडलो आहोत, या महामारीतून जगाला समतोल आरोग्याचा संदेश दिला गेला, त्यामुळे अशा आरोग्य शिबिरातून समाजाला सशक्त आणि मजबूत करण्याचे काम अशा शिबिरातून होत असल्याचे अरुण कदम यांनी बोलताना सांगितले.

यावेळी चेतन मोहिते, गौरव जाधव, मयूरेश जाधव, रुपेश जाधव, अमोल मोरे, प्रकाश जाधव, नरेश रुके, स्वाती रुके, एकता खैरे, पूजा मोहिते, वैभव पवार, अमित शिर्के आणि साक्षी रुके, प्रथमेश सावंत यांनी आरोग्य शिबिरात स्वयंसेवक म्हणून काम केले. यावेळी खार परिसरातील एक हजार हून अधिक नागरिकांनी आरोग्य शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरात वेदांत प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *