धार्मिक

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी आणि भाविकांना मोफत लाडू वाटप


मुंबई प्रतिनिधी-आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी मुंबई (परळ) ते लोणंद (सातारा) दर्शन सोहळ्यादरम्यान वारकरी आणि भाविकांना मोफत लाडू वाटप करण्यात येणार आहे.

आम्ही सातारकर प्रतिष्ठान गेल्या १३ वर्षांपासून वारीतील भाविकांना निःस्वार्थ भावनेने लाडू वाटपाची सेवा करत आहे. या सेवाकार्यात आतापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक आणि हितचिंतकांचे संस्थेने मनःपूर्वक आभार मानले आहेत.

यंदाही अधिकाधिक माऊली भक्तांनी या सेवाकार्यात सहभागी होऊन सदर कार्यात यथाशक्ती सहकार्य करावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. सेवाभाव आणि वारकरी परंपरेचा वारसा जपत भाविकांना प्रेमाने प्रसाद वाटप करण्याचा उपक्रम दरवर्षी उत्साहात पार पडत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमासाठी सतीश शिंदे, संतोष शेट सांगुडे, सुनील गावडे, विजय कपरे, शंकर पवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि असंख्य कार्यकर्ते विशेष सहकार्य करत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : शंकर पवार – 9987199565 आणि श्रीधर फडतरे – 8007779095.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *