शहर

चेंबूर लालडोंगर येथील अल्टा व्हिस्टा एसआरए सोसायटीत सेव्हरेज ओव्हरफ्लो, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर


संतोष शिंदे, मुंबई,
प्रतिनिधी-चेंबूर येथील लालडोंगर परिसरातील अल्टा व्हिस्टा एसआरए सोसायटीमध्ये सेव्हरेज लाईन ओव्हरफ्लो झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सोसायटीच्या परिसरात तसेच मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सेव्हरेज लाईनमधून सतत सांडपाणी बाहेर पडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून रस्त्यावर घाण साचली आहे. यामुळे पादचारी, वाहनचालक तसेच सोसायटीतील रहिवाशांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक रहिवाशांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य रस्त्यावर सांडपाणी आल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सेव्हरेज लाईनची दुरुस्ती करावी व परिसरातील साचलेले सांडपाणी हटवून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *