राजकीय

कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ व मार्गदर्शक आमदार प्रसाद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सायन रुग्णालयात शेकडो रुग्णांना मोफत चादर वाटप


मुंबई-(प्रतिनिधी)भाजप नेते, विधान परिषद सदस्य, भाजप मुख्य प्रतोद (कॅबिनेट मंत्री दर्जा) तसेच कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ व मार्गदर्शक आमदार प्रसाद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ठीक १ वाजता सायन रुग्णालयात रुग्णांसाठी मोफत चादर वाटप कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य उदय गंगाराम नांदे यांच्या वतीने करण्यात आले होते.

या सेवाभावी उपक्रमांतर्गत सुमारे २५० रुग्णांना मोफत चादरींचे वाटप करण्यात आले. रुग्णसेवा हीच खरी समाजसेवा या भावनेतून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी भाजप मुंबई कार्यकारिणी सदस्य श्री आशिष साळसकर, शेहबाज खान, मंगेश काकडे, राजकुमार गुप्ता, निहाल वारसी, आझम, मुन्ना, आयुब, मेहमूद तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *