राजकीय

विराज मुकुंद कुलकर्णी यांची भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या सचिवपदी नियुक्ती


मुंबई-(संतोष शिंदे)-भाजप मुंबई अध्यक्ष ॲड. अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भाजप अध्यक्ष दीपक सिंह यांनी नुकतीच मुंबईतील भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

यामध्ये अत्यंत नम्र, सौजन्यशील, सुशिक्षित, मनमिळाऊ आणि मृदुभाषी असलेले विराज मुकुंद कुलकर्णी यांची मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विराज कुलकर्णी हे भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी यांचे सुपुत्र आहेत.

या नियुक्तीचे भाजप नेते हरिनाथ तिवारी, अर्जुन गुप्ता, बालगोविंद तिवारी सर, रणजीत सिंह, ठाकूर नरेंद्र सिंह, राधेश्याम यादव सर, लल्लू सिंह सर, संदीप गुप्ता आणि इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *