गुन्हेताज्या घडामोडीराजकीय

प्रभादेवीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य विजयादशमी उत्सव संपन्न


मुंबई- विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रभादेवी नगर इकाईच्या वतीने आदर्श नगर वेल्फेअर सोसायटी येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रभादेवी नगर संघचालक परेश मांगलिक यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य भगवा ध्वजाला माल्यार्पण करून आणि संघ प्रार्थनेने झाली.

उत्सवाचे मुख्य अतिथी म्हणून आनंद राधाकृष्ण लाडसारिया, प्रतीक अन्नपूर्णा यशवंतराव पाडवे (शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान, लालबाग) उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून अमित सूर्यपाल पटेल (मुंबई संघटन महामंत्री) यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात बाल स्वयंसेवकांनी सादर केलेले सांघिक गीत, तसेच पारंपरिक शस्त्रपूजन हा सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरला. प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात आर. एस. एस. शाखांद्वारे समाजात जनजागृती घडविण्याचे आवाहन केले आणि संघाच्या १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या संकल्पांवर विशेष प्रकाश टाकला.या भव्य विजयादशमी उत्सवात स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *