आरोग्य

चेंबूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन


मुंबई-चेंबूर लाल डोंगर येथील अल्टा विस्टा एस आर ए इमारत परिसरात विभागातील नागरिकांसाठी रविवार दि. १७ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश चौक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर (एसआरएलसी) यांचे सहकार्य लाभणार आहे.

या शिबिरामध्ये नेत्र तज्ज्ञांकडून डोळ्यांची प्राथमिक तपासणी, दृष्टीदोष तपासणी तसेच गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. उच्च नंबरच्या चष्म्यांचे वितरणही पुढील काही दिवसांत विनामूल्य करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर ही संस्था आरोग्य, शिक्षण आणि मानवसेवा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून देशभरातील लाखो नागरिकांनी त्यांच्या नेत्रतपासणी मोहिमेचा लाभ घेतला आहे.

अल्टा विस्टा इमारतीमधील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत नेत्रतपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *