राजकीय

चेंबूरचे शिल्पकार स्व. शरदभाऊ आचार्य यांचा स्मृतिदिन साजरा


मुंबई (संतोष शिंदे )-चेंबूरचे शिल्पकार तथा माजी महापौर स्वर्गीय शरदभाऊ आचार्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त इंदिरा नगर, वाशी नाका येथील हनुमान मंदिर परिसरात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. आचार्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास शिवसेना उपनेते भाऊ कोरगांवकर, उपनेते सुबोध आचार्य, माजी विभागप्रमुख माणिक पाटील, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, नगरसेविका प्रज्ञा सदाफुले, विधानसभा संघटक निमिष भोसले, अरुण हुले, प्रदीप चित्रे, शाखाप्रमुख अविनाश शेवाळे, गणेश पाटील, शिवाजी झोरे, विजय नागावकर तसेच मनसेचे मंगेश पडवळ उपस्थित होते.

याचबरोबर महिला आघाडीच्या विजया पवार, छाया साळुंखे, रुक्मिणी भोसले, ज्येष्ठ शिवसैनिक तुळसीराम ठाकूर आदी मान्यवरांनीही स्व. आचार्य यांच्या कार्याची आठवण करून त्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमाचे आयोजन हनुमान सेवा मंडळाचे निमंत्रक राजेंद्र पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *