रिपाईचे विवेक पवार यांचे बाबासाहेब आणि महात्मा गांधींना अभिवादन
मुंबई-(अजित मोहिते)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी दोन ऐतिहासिक प्रसंगांनिमित्त सांताक्रूझ (पश्चिम) येथील भीमवाडा बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करुन समाज बांधवांना मार्गदर्शन केले तसेच जुहू चौपाटी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यांना देखील जयंती निम्मित अभिवादन केले.
प्रथम, 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सांताक्रूझ (पश्चिम) येथील भीमवाडा बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहून त्यांनी उपस्थित नागरिकांना व अनुयायांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचे स्मरण करून त्यांनी समाजाने बुद्ध व बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
तसेच, याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी जुहू चौपाटी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले. गांधीजींच्या अहिंसा, सत्य आणि शांतीच्या मार्गावर चालत समाजात एकोपा व सौहार्द टिकवणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

