सामाजिक

डॉ. प्रभाकर कांबळे यांना ‘कोल्हापूर रत्न’ पुरस्कार


राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या वर्धापन दिनानिमित्त 28 जून 2026 रोजी कोल्हापूर येथे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावर्षी वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांची ‘कोल्हापूर रत्न’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. समाजसेवा व पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाची दखल म्हणून हा सन्मान दिला जाणार आहे.

याशिवाय विविध क्षेत्रांतील मान्यवरांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *