उपवर्गीकरणाच्या विरोधात भूमिका जाहीर करण्याची भीम आर्मीची मागणी:
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा
मुंबई-अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापत असताना, कुर्ला अनुसूचित जाती (SC)विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशानुसार, उपवर्गीकरणाच्या विरोधात आमदार मंगेश कुडाळकर यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर भीम आर्मीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर राज्यभरात विविध सामाजिक संघटना आणि आंबेडकरी संघटनांकडून आंदोलनात्मक भूमिका घेतली जात असून, अनेक लोकप्रतिनिधींना आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार कुडाळकर यांच्याकडेही आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी केली आहे.
दरम्यान, या मागणीवर आमदार मंगेश कुडाळकर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. मात्र, या इशाऱ्यामुळे संबंधित मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

