धारावी वार्ड क्र. १८५ मध्ये नमो नेत्र संजीवनी अभियान मोठ्या उत्साहात संपन्न
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने धारावी वार्ड क्र. १८५ मध्ये “नमो नेत्र संजीवनी अभियान” मोठ्या उत्साहात व जनसहभागातून राबविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष नीरज उभारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
या अभियानांतर्गत स्थानिक नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, डोळ्यांशी संबंधित आजारांवर सल्लामसलत, चष्म्यांचे वितरण अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या नेत्र आरोग्याविषयी आवश्यक तपासणी करून घेतली.
स्थानिक नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी धोरणांचा गौरव केला. भाजपा कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

