खारदेवनगर पालिका वसाहतीमधील सारनाथ बुद्ध विहाराचे लोकार्पण
मुंबई-चेंबूरच्या खारदेव नगर महापालिका वसाहत मधील सारनाथ बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला आला. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४२४ चे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
खारदेवनगर पालिका वसाहतीत १९७९ साली सारनाथ बुद्ध विहार बांधण्यात आले होते. त्यानंतर त्याचा पहिला जीर्णोद्धार १९९१ नंतर २००४ मध्ये करण्यात आला होता. पत्रकार प्रसाद जाधव यांनी शिवसेनेचे स्थानिक आमदार तुकाराम काते यांच्याकडे या बुद्धविहाराचे नूतनीकरण क्राण्याची मागणी केली होती. त्यानुसार तुकाराम काते यांच्या प्रयत्नाने नुकतेच या बुद्धविहाराचे नूतनीकरण करण्यात आले होते. रविवारी त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी आ. तुकाराम काते, समाजसेवक तुषार काते, विधानसभा निरीक्षक रवी महाडीक, महिला शाखाप्रमुख किशोरी कडू, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४२४ चे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, चिटणीस रवी सावंत, न्यु. खरदेव गृहनिर्माण सोसायटीचे सरचिटणीस राजन जाधव, सारनाथ बुद्ध विहार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभय धारपवार, सरचिटणीस प्रणय जाधव, पत्रकार प्रसाद जाधव, दुष्यंत बापेरकर उपस्थित होते. संबोधी महिला मंडळाने कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली होती.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

