धारावी विधानसभा प्रभारी आणि विभाग प्रमुख भास्कर शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
मुंबई-दादर येथील सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त तसेच शिवसेना (शिंदे गट) धारावी विधानसभा प्रभारी आणि विभाग प्रमुख भास्कर शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त धारावीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत वडाला येथील अनाथ आश्रमातील मुलांना मॉम्स बिर्याणी आणि वही (नोटबुक) वाटप करण्यात आले. तसेच टाटा हॉस्पिटल समोर रुग्णांच्या नातेवाइकांना आणि रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरीब व निराधार नागरिकांना अन्नदान व पाणी वाटपाचे आयोजन करण्यात आले. याचबरोबर थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांना ब्लॅंकेटचेही वितरण करण्यात आले.
या उपक्रमात विजय दिवेकर, सलाइद्दीन भाई, विशाल गायकवाड, विकास सिह, जोनाथन कुट्टी, अरमान खान, प्रशांत शेट्टी, आकाश गावकर, अंकेश गुप्ता आदी कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि उपक्रम यशस्वी केला.
सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याची ही भास्कर शेट्टी यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची कार्यपद्धतीची आणि परंपरा असून, त्यांच्या या समाजाभिमुख दृष्टिकोनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

