चेंबूर : आरसीएफ फॅक्टरी परिसरातील व्हीआयपी रोडवर
चेंबूर : आरसीएफ फॅक्टरी परिसरातील व्हीआयपी रोडवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तब्बल १० फूट लांबीचा भारतीय रॉक पाइथन (अजगर) दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ सर्पमित्रांना कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले.
ही माहिती देताना कॉल करणारे सौरभ थाले यांनी सांगितले की, व्हीआयपी रोडलगतच्या झाडीत मोठ्या आकाराचा साप दिसल्याने नागरिक घाबरले होते. यानंतर सर्पमित्र शेखर मैत्री, दीपक निर्मल आणि सिद्धार्थ गायकवाड हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी योग्य कौशल्य आणि दक्षता दाखवत अजगराला जखमी न करता पकडले.
– शिवा नाडार

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

