सामाजिक

स्पार्टसन ग्रुपकडून कॅन्सरग्रस्तांसाठी अल्पोहार वाटप


 

मुंबई-समाजसेवा हिच ईश्वर सेवा या उदात्त विचाराने प्रेरित होत, सामाजिक बांधिलकीची परंपरा पुढे नेत स्पार्टसन ग्रुप तर्फे यंदाही कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अल्पोहार वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

आज रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता दादर येथील संत गाडगे महाराज संस्था येथे पार पडलेल्या या उपक्रमात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना सकाळच्या अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. स्पार्टसन ग्रुपच्या वतीने सेवाभावीवृत्तीने राबविलेल्या या उपक्रमाबाबत कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

 या वेळी स्पार्टसन ग्रुपचे संस्थापक रमेश खरे, अध्यक्ष सुपेंद्र पवार, उपाध्यक्ष गणेश मांजरेकर, सचिव अवधुत साळुंखे, उपसचिव रोहित देवकांत, खजिनदार दिनेश मेदार, उपखजिनदार राजकुमार प्रजापती, सदस्य पियुष भंडारी, किरण मोरे, मनोज जैसवार, युवराज पाटील, चंदशेखर गवई तसेच सल्लागार विनोद सावंत आणि निमेश राठोड आदी सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *