ताज्या घडामोडी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पुढाकार


महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त बांधवांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्तम आदर्श फायर वॅक्स कंपनीचे मालक संतोष मराठे यांनी घालून दिला आहे. त्यांनी पुरग्रस्तांसाठी १,११,०००/- (एक लाख अकरा हजार रुपये) इतक्या रकमेचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

ही मदतकार्यवाही भाजपच्या माजी नगरसेविका आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा आशाताई सुभाष मराठे यांच्या पुढाकाराने पार पडली. या प्रसंगी भाजपा मुंबई जिल्हाध्यक्ष नीरज उभारे, आमदार प्रसाद लाड, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ही आर्थिक मदत निश्चितच मोठा दिलासा ठरणार आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून दिलेल्या या मदतीबद्दल संतोष मराठे यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *