ताज्या घडामोडी

लॉन्गमार्चच्या स्वागत व नियोजनासाठी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक


संतोष शिंदे,मुंबई
अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात बीड ते मुंबई असा निघालेला ऐतिहासिक लॉन्गमार्च दिनांक २५ जून २०२६ रोजी मुंबईत दाखल होणार असून, या लॉन्गमार्चच्या जंगी स्वागतासह भव्य सभेच्या नियोजनासाठी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती एकता समिती, मुंबई – महाराष्ट्र यांच्या वतीने ही बैठक सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शहीद स्मारक, रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत लॉन्गमार्चच्या स्वागताची रूपरेषा, सभेचे नियोजन तसेच विविध संघटनांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व संविधानवादी, आंबेडकरवादी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीस यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

लॉन्गमार्चचे मुख्य संयोजक अशोक कांबळे यांनी मुंबईतील सर्व आंबेडकरी जनतेने एकजूट दाखवत या ऐतिहासिक आंदोलनाला पाठिंबा द्यावा व बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

संपर्क-अशोक कांबळे, मुख्य संयोजक (लॉन्गमार्च) अनुसूचित जाती एकता समिती, मुंबई-महाराष्ट्र मोबाईल-७६७८०१८३१८


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *