आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबिर


मुंबई-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मनपा प्रभाग समिती अध्यक्षा तथा प्रभाग क्रमांक १५२ च्या नगरसेविका आशा ताई मराठे यांच्या पुढाकाराने चेंबूर येथील सुभाष नगर परिसरात महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर)तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या आरोग्य शिबिराला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून महिलांची तपासणी करण्यात आली तसेच स्तन कर्करोगाबाबत जनजागृती करून नियमित तपासणीचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

शिबिरादरम्यान उपस्थित सर्व महिलांना टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले. तसेच सहभागी महिला आणि उपस्थित नागरिकांसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, स्थानिक नागरिकांनी आशा ताई मराठे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत कौतुक व्यक्त केले


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *