सामाजिक

गिरणगावात रंगला ‘मी मराठी’ लोकचळवळ अभियान कार्यक्रम


मुंबई (प्रभाकर कांबळे)- मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मैत्री संस्था व उत्प्रेरक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मी मराठी’ लोकचळवळ अभियानांतर्गत कवी संमेलन व ‘मी मराठी राज्यभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम गिरणगावातील करी रोड भागातील महाराष्ट्र हायस्कूल मैदानाजवळील मनपा मजदूर कार्यालयाच्या बाळ दंडवते सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘मी मराठी राज्यभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये गुणवंत कामगार डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे, केरबा हरिबा डावरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तावडे, संजय तावडे, महेंद्र ब्रीद, प्रसन्न परकर, डॉ. राजेंद्र जाधव, राजेंद्र सावंत, राजू सोनकांबळे तसेच सिडको अधिकारी वैशालीताई कांबळे यांचा समावेश होता.
प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित, चारुशीला देशमुख, संभाजीराव राजे जाधवराव, विलास खानोलकर, आशाताई भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मैत्री संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे सर्वेसर्वा सुरज भोईर होते.

कार्यक्रमाची सुरुवात निमंत्रित कवींच्या कवी संमेलनाने झाली. महाराष्ट्राचे लोकशाहीर दत्तात्रय म्हात्रे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सदाबहार मराठी स्मृती गीतांनी वातावरण भारावून गेले. तसेच मानखुर्द येथील अंगणवाडी सेविकांनी गाण्याच्या तालावर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

या कार्यक्रमाला पोलीस मित्र दिलीप नारद, आदर्श शिक्षिका स्पृहा सुरेश इंदू, डॉ. संदीप नेवळेकर, ज्येष्ठ कवी मोहन जाधव, प्रियांका भोईर कांबळे, डॉ. संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा संवर्धन आणि जतन करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याविषयी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संतोष कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.


निर्भय युवा

मुख्य संपादक-संतोष लक्ष्मण शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *